Ad will apear here
Next
‘क्लिअरटॅक्स’द्वारे ‘जीएसटीआर-९’ सॉफ्टवेअर सादर
जीएसटी वार्षिक ऑडिट अचूक भरण्यासाठी होणार मदत
मुंबई : भारताच्या आघाडीच्या टॅक्स, जीएसटी अनुपालन आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकीत अग्रेसर ‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटीआर-९ फायलिंग’ सॉफ्टवेअर सादर केले आहे. हे सॉफ्टवेअर सनदी लेखापाल (सीए) तसेच व्यावसायिकांना कोणत्याही अडचणीशिवाय ‘जीएसटीआर-९’ भरण्यासाठी मदत करणार आहे. 

‘जीएसटीआर-९’ फॉर्म म्हणजे जुलै २०१७ ते मार्च २०१८ मध्ये भरलेल्या सर्व जीएसटी रिटर्न्सचा सारांश आहे. यात सुधारणा आणि पुरवठा चलनांचादेखील समावेश आहे, जे मार्च २०१९ पर्यंत दाखल करायचे होते. २१ महिन्यांचा जीएसटी डेटा आपल्या अकाउंटिंग बुक्सशी अचूक मिळविणे, तसेच काही विसंगती असल्यास ती शोधून त्यानुसार ‘जीएसटीआर-९’ फाइल करणे हे व्यवसायांकडून अपेक्षित आहे. 

‘क्लिअरटॅक्स’चे ‘जीएसटीआर-९’ सोल्युशन जवळजवळ या संपूर्ण फॉर्मची स्वतः आकडेमोड करून या संपूर्ण प्रक्रियेचे ऑटोमेशन करते. एका विस्तृत चेकलिस्टमध्ये रिटर्नमध्ये असलेल्या समस्या शोधून काढल्या जातात व त्यायोगे यूझरला फायलिंग करतेवेळी त्या चुका टाळण्यासाठी सावध केले जाते.

या विषयी बोलताना ‘क्लिअरटॅक्स’चे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणाले, ‘आम्ही रिटर्न फायलिंगची एक विश्वसनीय आणि सुलभ आवृत्ती सादर केली आहे, जी सीए आणि व्यावसायिकांना ‘जीएसटीआर-९’ सुरळीतपणे फाइल करण्यास मदत करेल. त्यांना फक्त इतकेच करायचे आहे की, सरकारी वेबसाइटवरून आपला डेटा एक क्लिक करून इम्पोर्ट करायचा, व्यवसायाच्या स्वरूपाबद्दल काही प्रश्नांची उत्तरे द्यायची, गरज वाटल्यास ‘जीएसटीआर-९’ रिपोर्टचा आढावा घ्यायचा आणि मग काही मोजक्या क्लिकद्वारे फायलिंगचे काम संपवायचे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZWKCB
Similar Posts
‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक कंप्लायन्स टूल’ सादर मुंबई : ‘क्लिअरटॅक्स’ या टॅक्स, फायनॅन्स आणि अनुपालन सोल्युशन पुरवठादार कंपनीतर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक’ हे नवीन टूल सादर करण्यात आले आहे. हे टूल एखाद्या व्यवसायाच्या जीएसटी हेल्थचा तपशीलवार रिपोर्ट काढून त्या व्यवसायाला डेटाचा आधार असलेली जीएसटीविषयक माहिती देते. अचूक इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यासाठी,
जीएसटीआर-९ कोणत्याही विलंबाशिवाय तयार करणे आवश्यक आपण लवकरच जीएसटीच्या तिसऱ्या वर्षात पाऊल ठेवणार आहोत. सध्या व्यावसायिक जीएसटी अंमलबजावणीचे पहिले वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी कम्प्लायन्ससाठी संघर्ष करीत आहे. २०१७-१८साठी वार्षिक परतावा ज्याला जीएसटीआर-९ म्हटले जाते त्याची देय तारीख ३० जून २०१९ आहे, तो जटिल फॉर्म आहे ज्यासाठी गहन पुनर्मेळ करणे आवश्यक आहे
क्लियरटॅक्स ई वे बिल सादर मुंबई : व्यवसायाचे अनुपालन सोपे आणि सोयीस्कर बनविण्याचा आपला उद्देश अधोरेखित करत, ‘क्लियरटॅक्स’ या भारताच्या अग्रगण्य टॅक्स आणि अनुपालन मंचाने अलीकडेच ‘क्लियरटॅक्स ईवे बिल’ लाँच केले आहे. कोणत्याही इआरपी प्रणालीशी जुळवून घेणारे क्लियरटॅक्स ईवे बिल हे एक अत्यंत वेगवान सॉफ्टवेअर आहे, ज्याचा उद्देश आहे व्यवसायांसाठी ईवे बिल अनुपालन अत्यंत सोपे करणे
क्लिअरटॅक्स आयकर विवरण सुविधा आता शाओमीच्या कॅलेंडर अॅपवर मुंबई : आयकर विवरणपत्र सादर करण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख जवळ येत असतानाच ‘क्लिअरटॅक्स’ ने विवरणपत्र सादर करण्याची सुविधा शाओमी या एमआययूआय प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनच्या एमआय कॅलेंडर अॅपवरही उपलब्ध केली आहे. येथील अॅपवर ग्राहकांना त्यांचे आयकर विवरणपत्र आता थेट सादर करता येणार आहे. ई-फायलिंगचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language